‘केजीएफ चॅप्टर २’ पुन्हा रखडला, ‘या’ कारणामुळे चित्रपटाचं प्रदर्शन गेलं लांबणीवर!

दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या वाढदिवसाची भेट म्हणून केजीएफ चॅप्टर २ चा टीझर प्रदर्शित करण्यात येणार होता. ७ जानेवारीला चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता.

    येत्या १६ जुलै रोजी अभिनेता यशचा ‘केजीएफ चॅप्टर २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.

    केजीएफ चॅप्टर २ च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरु आहे. तसेच चित्रपटगृहे पुन्हा सुरु झाल्यावर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या वाढदिवसाची भेट म्हणून केजीएफ चॅप्टर २ चा टीझर प्रदर्शित करण्यात येणार होता. ७ जानेवारीला चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता.

    ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटात अभिनेत्री रविना टंडन एका राजकीय व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘केजीएफ चॅप्टर – १’ हा चित्रपट ज्या ठिकाणी संपला, तेथूनच पुढे केजीएफ चॅप्टर 2 ची कथा सुरु होत आहे. या सिक्वलमध्ये यशसोबत संजय दत्त आणि रविना टंडन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.