‘मिसेस श्रीलंका’ स्पर्धेच्या विजेतीचा मुकूट परिक्षकांनीच हिसकावला, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल!

‘मिसेस श्रीलंका’ या स्पर्धेमध्ये झालेल्या गोंधळाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मिसेस श्रीलंका २०१९चे विजेतेपद पटकावणारी कॉरोलिन परिक्षक म्हणून सहभागी झाली होती.

    नुकतीच मिसेस श्रीलंका ही सौंदर्य स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या या व्हिडिओचीच चर्चा आहे. परिक्षकांनी या स्पर्धेची विजेती पुष्पिका डी सिल्वा असल्याचे सांगितले. पण नंतर काही वेळातच तिच्याकडून विजेतेपदाचं मुकूट हिसकावून घेण्यात आला.

    ‘मिसेस श्रीलंका’ या स्पर्धेमध्ये झालेल्या गोंधळाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मिसेस श्रीलंका २०१९चे विजेतेपद पटकावणारी कॉरोलिन परिक्षक म्हणून सहभागी झाली होती. तिने पुष्पिकाला विजेती घोषित करुन मुकूट घातला होता. पण काही वेळा नंतर ती पुन्हा मंचावर आली आणि तिने पुष्पिकाचे मुकूट हिसकावून घेतले.

    पुष्पिका ही घटस्फोटीत असल्यामुळे कॅरोलिनने तिला स्पर्धेसाठी अपात्र असल्याचे ठरवत उपविजेतीला मुकूट घातले. ‘मिसेस श्रीलंका’ ही स्पर्धा केवळ विवाहित महिलांसाठी असल्याचे कॉरोलिनने म्हटले.