sushant singh rajputs vescera report

अभिनेता सुशांतसिंग राजपूत(sushant singh rajput) मृत्यू प्रकरणात ईडीच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. या पुराव्याचे कनेक्शन थेट प्रोड्युसर दिनेश विजान आणि त्याच्या प्रॉडक्शन हाऊसशी जोडण्यात येत आहे.

दिल्ली: अभिनेता सुशांतसिंग राजपूत(sushant singh rajput) मृत्यू प्रकरणात ईडीच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. या पुराव्याचे कनेक्शन थेट प्रोड्युसर दिनेश विजान आणि त्याच्या प्रॉडक्शन हाऊसशी जोडण्यात येत आहे. सुशांतला राबता या सिनेमासाठी १७ कोटींची रक्कम देण्यात आली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यवहाराची सखोल चौकशी केली जात आहे. १७ कोटींचे हे पेमेंट २०१७ मध्ये सुशांतला राबता या चित्रपटासाठी देण्यात आले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी फिल्म प्रोड्यूसर दिनेश विजान यांची गेल्या महिन्यात चौकशी केली होती.

दिनेश विजानने आपल्या प्रोडक्शन हाऊसतर्फे आपली भूमिका मांडली आहे. मी सुशांतला पैसे दिले नव्हते. मॅडॉक फिल्म्सतर्फे सुशांतसिंग राजपूतला पैसे देण्यात आले नव्हते आणि सुशांतने ते १७ कोटी रुपयांचे मानधन हंगेरीमध्ये घेतले नव्हते. आम्ही सुशांतच्या ‘राबता’ सिनेमाचे पूर्ण मानधन दिले होते. सुशांतला भारतामध्ये मानधन देण्यात आले होते. आम्ही ईडीकडे याचे सगळे पुरावे सादर केले आहेत. हंगरीमध्ये होणारे शूटिंग आणि त्याचे मानधान याबाबत सगळे व्यवहार टी सीरिजतर्फे करण्यात आले होते. टी सीरिजच्या लोकांकडून तुम्ही याची खात्री करून घेऊ शकता, असेही विजान यांनी स्पष्ट केले आहे.