Jacqueline Fernandez beauty tipas2

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी(Money Laundering Case) जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या रडारवर आहे. नवी दिल्लीमध्ये पाच तासांपासून ईडी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची चौकशी करत आहे.

    अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी सुरु आहे. अशातच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी(Money Laundering Case) जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या रडारवर आहे. नवी दिल्लीमध्ये पाच तासांपासून ईडी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची चौकशी करत आहे.

    नॅशनल स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने चौकशी सुरू केली आहे. राजकीय वर्तुळासोबत आता बॉलिवूडमध्ये सुद्धा मनी लाँड्रिंग प्रकरणाचे धागे दोरे मिळण्यास सुरूवात झालेली आहे. जॅकलीनची ‘भूत पोलीस’मधील सह-कलाकार यामी गौतमला ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायदा अंतर्गत कथित अनियमिततांबाबत तिचं जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं. आता यानंतर जॅकलीनला देखील ईडीने समन्स बजावत चौकशीसाठी बोलावलं होतं. गेल्या पाच तासांपासून ईडीकडून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात येतंय.

    अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या बँक खात्यात एका परदेशी संस्थेकडून तब्बल १ कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम आली होती. यात फेमा मार्गदर्शक तत्वांचं कोणतंही पालन करण्यात आलेलं नाही. ईडी यासंदर्भात चौकशी करत आहे.