शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर मनी लाँड्रींगचाही आरोप, ईडीने केला गुन्हा दाखल

पॉर्नोग्राफी केसमध्ये(Pornography Case) अडकलेल्या राज कुंद्राविरोधात आता ईडीने पीएमएलए केस (ED Registered Case Against Raj Kundra) दाखल केली आहे. ईडीला राज कुंद्राविरोधात मनी लाँड्रींगचे पुरावे सापडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात (ED finds evidence of money laundering) आला आहे.

    मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्राच्या(Raj Kundra) अडचणी रोज वाढताना दिसत आहेत. पॉर्नोग्राफी केसमध्ये(Pornography Case) अडकलेल्या राज कुंद्राविरोधात आता ईडीने पीएमएलए केस (ED Registered Case Against Raj Kundra) दाखल केली आहे. ईडीला राज कुंद्राविरोधात मनी लाँड्रींगचे पुरावे सापडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात (ED Finds Evidence Of Money Laundering) आला आहे.

    पॉर्नोग्राफिक कंटेटच्या (Raj Kundra Pornography Case) विक्रीद्वारे मिळवलेला निधी लंडनमधील एका Llyod बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचा आरोप राज कुंद्रावर करण्यात आला आहे.

    राज कुंद्राला १९ जुलैला अटक करण्यात आली. पॉर्नोग्राफी प्रकरणात राजसह त्याच्या काही साथीदारांना अटक करण्यात आली होती. मुंबईच्या न्यायालयीन कोठडीत असलेला राज कुंद्राविरोधात मुंबई क्राइम ब्रँचने (Mumbai crime Branch) बुधवारी एक चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये ४३ लोकांची साक्षही नोंदवण्यात आली आहे. त्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि शर्लिन चोप्राचाही (Sherlyn Chopra) समावेश आहे.