‘साराभाई’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन, चाहते हळहळले!

तरला जोशी यांनी ‘बंदिनी’, ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ आणि ‘एक हजार में मेरी बेहना है’ यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.

    लोकप्रिय मालिका साराभाई व्हर्सेस साराभाई मध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री तरला जोशी यांचं निधन झालं आहे. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तरला जोशी यांच्या निधनाचे कारण अजूनही समोर आलेलं नाही. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तरला जोशी यांना श्रद्धांजली वाहात आहेत. तरला जोशी या छोट्या पडद्यावरील ‘बा’ म्हणून ओळखल्या जात होत्या.

    तरला जोशी यांनी ‘बंदिनी’, ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ आणि ‘एक हजार में मेरी बेहना है’ यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. ‘बंदिनी’ या मालिकेतून तरला यांना खरी ओळख मिळाली होती. तर ‘एक हजार में मेरी बेहना है’ या मालिकेत त्यांनी अभिनेत्री निया शर्मा आणि क्रिस्टल डिसूझासोबत काम केले होते. ‘एक हजारो में मेरी बेहना है’ मालिकेत त्यांनी त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.