‘ही वेळ आहे खटला २ची’, एकता कपूरची नवी घोषणा, नेमकी काय आहे जाणून घ्या!

 एकताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “ही वेळ आहे खटला २ची. जनता विरुद्ध इंदिरा गांधी. कौतुकास्पद त्याचबरोबर टीकेसही पात्र असलेली ही महिला.

    लवकरच एकता कपूर एक नवीन वेबसिरीज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इंदिरा गांधींपासून प्रेरणा घेऊन ही वेबसिरीज असल्याचं एकताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. एकताने इन्स्टाग्रामवर हे पोस्टर शेअर करत ही माहिती दिली. अल्ट बालाजी या प्रॉडक्शन हाऊसची नवी वेबसीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor)

    एकताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “ही वेळ आहे खटला २ची. जनता विरुद्ध इंदिरा गांधी. कौतुकास्पद त्याचबरोबर टीकेसही पात्र असलेली ही महिला. एक महत्त्वकांक्षी कथा.” यासोबतच तिने दोन पुस्तकांची मुखपृष्ठेही शेअर केली आहेत- द केस दॅट शूक इंडिया आणि इमर्जन्सी रिटोल्ड.

    अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वीच ती एका चित्रपटात इंदिरा गांधीची भूमिका करणार असल्याचं जाहीर केलं होतं. विद्या बालननेही सांगितलं होतं ही ती पूर्व पंतप्रधानांची भूमिका साकारणार आहे. मात्र, त्यानंतर त्यासंदर्भात कोणतीही गोष्ट समोर आली नाही. आता एकता कपूरच्या या नव्या घोषणेमुळे इंदिरा गांधीची भूमिका कोण करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.