हॉरर चित्रपटाचे निर्माते कुमार रामसे यांचे निधन!

बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर रोमँटिक चित्रपट तयार केले जातात. परंतु कुमार रामसे हे पहिले निर्माते होते ज्यांनी भयपटांच्या दिशेने आपला मोर्चा वळवला.

    दिलीप कुमार यांच्या दु:खातून बाहेर पडण्याआधीच भारतीय प्रेक्षकांना आणखी धक्का बसला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते कुमार रामसे याचं निधन झालं आहे. ते ८५ वर्षांचे होते. ८ जुलैला सकाळी ५.३० च्या सुमारास त्यांना कार्डिअ‍ॅक अरेस्टच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. कुमार रामसे हे भयपटांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय सिनेसृष्टीतीला आणखी एक धक्का बसला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

    बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर रोमँटिक चित्रपट तयार केले जातात. परंतु कुमार रामसे हे पहिले निर्माते होते ज्यांनी भयपटांच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. त्यांनी पुराना मंदिर, साया, खोज, दरवाजा, और कौन, दहशत यांसारख्या अनेक सुपरहिट भयपटांची निर्मिती केली. त्यांनी हॉरर चित्रपट पाहणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता.

     ७०-८० च्या दशकात त्यांच्या चित्रपटांची तुलना अनेकदा जगप्रसिद्ध हॉररपट निर्माते अल्फ्रेड हिचकॉक यांच्याशी केली जायची. मात्र गेल्या काही काळात ते वाढत्या वयामुळे फिल्मी दुनियेपासून दूर होते.