‘इटर्नल्स’मधून भारतीय संस्कृतीचं दर्शन, हा बॉलिवूड अभिनेता दिसणार मुख्य भुमिकेत!

मार्व्हलचा हा पहिला असा ट्रेलर आहे ज्यातून चित्रपटाची कथा किंवा चित्रपट कोणत्या कॉमिकवर आधारित आहे हे स्पष्ट होत नाही. हा चित्रपट या आधीच्या मार्व्हल चित्रपटाहून अत्यंत वेगळा असून मार्व्हल युनिव्हर्समधील 'सेलेस्टियल'चं जग उलगडणार आहे.

    मार्व्हलचा बहुप्रतिक्षित ‘इटर्नल्स’ हा सिनेमा नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ३ मेला मार्व्हलनं प्रदर्शित केलेल्या ‘सेलिब्रिट मूव्हीज’ या व्हिडीओ क्लिपमध्ये ‘इटर्नल्स’चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता मार्व्हलनं ‘इटर्नल्स’चा ट्रेलर प्रदर्शित केला  आहे. हा ट्रेलर बघून प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

    मार्व्हलचा हा पहिला असा ट्रेलर आहे ज्यातून चित्रपटाची कथा किंवा चित्रपट कोणत्या कॉमिकवर आधारित आहे हे स्पष्ट होत नाही. हा चित्रपट या आधीच्या मार्व्हल चित्रपटाहून अत्यंत वेगळा असून मार्व्हल युनिव्हर्समधील ‘सेलेस्टियल’चं जग उलगडणार आहे.

    विषेश म्हणजे या चित्रपटात भारतीय संस्कृतीचं दर्शन घडणार आहे. हरीश पटेल या बॉलिवूडमधील अभिनेत्याची या चित्रपटात वर्णी लागली आहे. तर कुमाईल नानिजानी हा कलाकार बॉलिवूड अभिनेत्याची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट या वर्षाच्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा ऑस्कर मिळवणाऱ्या क्लोई झाओ यांनी दिग्दर्शित केला आहे.