Priyanka Chopra

या यादीत एकूण ३९५ सेलिब्रिटींचा सामावेश करण्यात आला आहे. या यादीत पहिल्या तीस सेलिब्रिटींमध्ये केवळ दोन भारतीय आहेत.

  प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रियांकानं हॉलिवूड सिनेसृष्टीतही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रियांका सध्या यशाच्या शिखरावर आहे. अन् त्यामुळेच तिचा सोशल मीडियावरील भाव देखील कमालीचा वाढला आहे. प्रियांका एका पोस्टसाठी तब्बल तीन कोटी रुपयांपर्यंतच मानधन घेते.  तर प्रियांकासोबत भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याची वर्णी लागली आहे. तो १९ व्या स्थानावर आहे. त्याला एका पोस्टसाठी जवळपास पाच कोटी रुपये दिले जातात.

  हॉपरएचक्यू या वेबसाईटनं सोशल मीडियावरील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहिर केली आहे या यादीत बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा २७ व्या स्थानावर आहे. वेब साईटनं केलेल्या दाव्यानुसार तिला एका पोस्टसाठी कमीतकमी ३ कोटी रुपयांचं मानधन दिलं जातं. या यादीत विल स्मीथ, डेव्हिड बेकम, एमा वॉटसन यांसारखे अनेक नामांकित हॉलिवूड सेलिब्रिटी आहेत. परंतु लक्षवेधी बाब म्हणजे या सर्व सेलिब्रिटींच्या वर एका भारतीय अभिनेत्रीनं स्थान मिळवलं आहे. त्यामुळं चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

  या यादीत एकूण ३९५ सेलिब्रिटींचा सामावेश करण्यात आला आहे. या यादीत पहिल्या तीस सेलिब्रिटींमध्ये केवळ दोन भारतीय आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra)