‘कोरोना विरुद्धच्या लढाईत यशस्वी होण्यासाठी प्रत्येकानं लस घेणं गरजेचं’, पुष्कर- प्रार्थनाचं चाहत्यांना आवाहन!

या कठीण काळात सर्वांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. सध्याच्या परिस्थितीत लस हा कोरोनापासून बचाव करण्याचा प्रभावी उपाय असल्याचं सांगितलं जात असल्यानं प्रत्येकानं ती घेतली पाहिजे

  मराठीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक असलेल्या पुष्कर जोग आणि प्रार्थना बेहरे या कलाकारांनी नुकताच कोविडच्या लसीचा पहिला डोस घेत सर्वसामान्यांसमोर स्वत: उदाहरण सादर केलं आहे. रविवारचा मुहूर्त साधत पुष्करनं लसीकरणाच्या पहिल्या डोससाठी मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलला भेट दिली. कोविड-१९ विरुद्धची लढाई आणखी स्ट्राँग करण्यासाठी नागरिकांना लसं घेण्याचं आवाहनही पुष्करनं केलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar)

  कोरोना विरुद्धच्या लढाईत यशस्वी होण्यासाठी प्रत्येकानं लस घेणं गरजेचं असल्याचं पुष्करनं म्हटलं आहे. पुष्करच्या जोडीनं प्रार्थनानंही आपली पहिली लस वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये घेतली. प्रार्थनानंही आपल्या चाहत्यांसोबतच तमाम जनतेला लस घेण्यासाठी आवाहन केलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

  या कठीण काळात सर्वांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. सध्याच्या परिस्थितीत लस हा कोरोनापासून बचाव करण्याचा प्रभावी उपाय असल्याचं सांगितलं जात असल्यानं प्रत्येकानं ती घेतली पाहिजे असंही दोन्ही कलाकारांनी आवर्जून सांगितलं आहे. जनतेमध्ये जागरूकता पसरावी यासाठी पुष्कर आणि प्रार्थना या दोघांनीही लस घेतानाचे व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.