आता अनुष्का शर्माने प्रेग्नन्सीकाळात वापरलेले कपडे तुम्हीही वापरू शकता, कसे ते जाणून घ्या!

 गर्भारपणात असताना वापरलेले कपडे काही महिन्यांसाठीच वापरले जातात. पुन्हा ते वापरण्याची वेळ सध्याच्या काळात क्वचितच येते. म्हणूनच ते कपडे सर्क्युलर फॅशन या कल्पनेअंतर्गत विकून दुसऱ्या कोणाला तरी वापरायला द्यायचे, अशी संकल्पना मांडण्यात येत आहे.

    प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माने एक निर्णय घेतला आहे. तिने गर्भारपणात वापरलेले कपडे (Clothes used during pregnancy) एका वेबसाइटद्वारे विक्रीला देणार आहे. आणि त्याच विक्रीतून उभा राहणारा निधी सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने जानेवारी २०२१ मध्ये गोड मुलीला जन्म दिला. तिचं नाव वामिका असं ठेवण्यात आलं आहे.

    गर्भारपणात असताना वापरलेले कपडे काही महिन्यांसाठीच वापरले जातात. पुन्हा ते वापरण्याची वेळ सध्याच्या काळात क्वचितच येते. म्हणूनच ते कपडे सर्क्युलर फॅशन या कल्पनेअंतर्गत विकून दुसऱ्या कोणाला तरी वापरायला द्यायचे, अशी संकल्पना मांडण्यात येत आहे.

    अनुष्का शर्मा म्हणाली, ‘माझ्या गर्भारपणात मला जाणीव झाली, की सर्क्युलर फॅशन इकॉनॉमीमध्ये सहभागी होण्यासाठी ही योग्य वेळ आहे. गर्भारपणातले कपडे फक्त काही महिन्यांसाठीच वापरले जातात. ते तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाबद्दल मी माहिती घेतली. त्यातून माझ्या लक्षात आलं, की हे कपडे शेअर केले गेले, तर एक चांगली यंत्रणा उभी राहू शकते. हे कपडे एकमेकांना विकले जाऊ शकतात,’ असं ती म्हणाली.

    भारतातल्या शहरी भागातल्या अगदी एक टक्का गर्भवती महिलांनीही नव्या कपड्यांऐवजी वापरलेले कपडे विकत घेतले, तरीही एका माणसाला २०० वर्षांत प्यायला जेवढं पाणी लागेल, तेवढं पाणी दर वर्षी वाचवलं जाऊ शकतं. शेअरिंग या कल्पनेवर माझा दृढ विश्वास आहे. म्हणूनच आता माझ्या गर्भारपणातले कपडे आता कोण घेतंय, हे पाहण्याची मला उत्सुकता आहे,’ असं अनुष्का शर्माने सांगितलं.

    अनुष्काचे हे कपडे Dolce Vee या सोशल एंटरप्राइजच्या (Social Enterprise) वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्या कपड्यांच्या विक्रीतून आलेली रक्कम ‘स्नेहा’ (SNEHA) प्रकल्पांतर्गत माता आरोग्यासाठी वापरली जाणार आहे.