sai lokur engagement

तीर्थदीप आणि माझी ओळखसुद्धा मॅट्रिमोनिअल साईटवरूनच झाली आणि ऑगस्टपासून आम्ही बोलू लागलो. काही दिवसांतच आम्हाला एकमेकांचा स्वभाव आवडू लागला आणि एकमेकांविषयी आम्ही फार सकारात्मक होतो. त्यानंतर तो आईला घेऊन बेळगावला मला भेटायला आला. त्या भेटीतच आमचे लग्न ठरले. खूप घाईत प्रत्येक गोष्ट घडली पण माझ्यासाठी हेच नाते असावे असे मला मनापासून वाटतेय.

‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूरने ( Bigg Boss Marathi ‘fame Sai Lokur) नुकतेच साखरपुड्याची (Engagement) घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. तीर्थदीप रॉयशी (Tirthadeep Roy) ती लग्नगाठ बांधणार असून या दोघांचा साखरपुडा नुकताच पार पडला. तीर्थदीपशी कशी ओळख झाली आणि लग्नाचा निर्णय कसा घेतला याविषयी सईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. मुलाखतीत सई म्हणाली, गेल्या दोन वर्षांपासून मी मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर माझ्या ‘मिस्टर परफेक्ट’ला शोधत होती.

तीर्थदीप आणि माझी ओळखसुद्धा मॅट्रिमोनिअल साईटवरूनच झाली आणि ऑगस्टपासून आम्ही बोलू लागलो. काही दिवसांतच आम्हाला एकमेकांचा स्वभाव आवडू लागला आणि एकमेकांविषयी आम्ही फार सकारात्मक होतो. त्यानंतर तो आईला घेऊन बेळगावला मला भेटायला आला. त्या भेटीतच आमचे लग्न ठरले. खूप घाईत प्रत्येक गोष्ट घडली पण माझ्यासाठी हेच नाते असावे असे मला मनापासून वाटतेय.

तीर्थदीपचे राहणीमान अत्यंत साधे असून त्याचा स्वभावसुद्धा सकारात्मक असल्याचे सईने सांगितले. मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर मी अनेक मुलांना नाकारले. जर एखादा मुलगा फोटो पाहूनच आवडला नसेल तर मी त्याचे प्रोफाईलसुद्धा उघडून पाहत नव्हते. पण जेव्हा मी तीर्थदीपचा फोटो पाहिला तेव्हा माझ्यासाठी हाच जोडीदार असावा असे मनापासून वाटले, असे ती म्हणाली.