अभिनेता सुशांत राजपूतच्या अस्थीचं कुटुंबियांकडून गंगेत विसर्जन

पाटणा : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अस्थीचं विसर्जन गंगा नदीत करण्यात आलं आहे. यावेळी त्याच्या संपूर्ण कुटुंबियांसमवेत अखेरचा निरोप देण्यात आला आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, पाटण्यात सुशांतचे

पाटणा : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अस्थीचं विसर्जन गंगा नदीत करण्यात आलं आहे. यावेळी त्याच्या संपूर्ण कुटुंबियांसमवेत अखेरचा निरोप देण्यात आला आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, पाटण्यात सुशांतचे वडील, बहीण, आणि भावोजीसह काही नातेवाईकांनी नदी पार करुन अस्थीकलश विसर्जित केला आहे.   

सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी त्याचे वडील बिहारहून मुंबईला आले होते. १५ जून रोजी सुशांतच्या पार्थिवावर मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तसेच त्याचे संपूर्ण कुटुंब, नातेवाईक आणि मित्र देखील उपस्थित होते. दरम्यान, कूपर रुग्णालयापासून सुरु झालेल्या त्याच्या अखेरच्या प्रवासात मोठे कलाकार वगळता काही मोजक्याच बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. तसेच सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रियाने आज सकाळी ११ वाजता जबाब नोंदवला होता. कारण रिया ही सुशांतच्या संपर्कात होती. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचं कारण काय असू शकतं, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.