प्राण आपल्यावर बलात्कार करतील अशी भिती अभिनेत्री अरूणा इराणी यांच्या मनात होती, आणि शुटींगदरम्यान त्या रात्री घडल असं की….

अरूणा इरानी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी हाँककाँग इथं गेल्या होत्या. त्या चित्रपटात प्राण खलनायकाच्या भूमिकेत झळकणार होते. दरम्यान ज्या हॉटेलमध्ये अरूणा यांची बुकिंग करण्यात आली होती. तिथं काही अडचणी आल्यामुळे त्यांना दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात आलं.

    प्राण हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. ते खऱ्याखुऱ्या आयुष्यातही खलनायकच आहेत की काय? अशी शंका अनेकदा घेतली जायची. असाच काहीस घडलं अभिनेत्री अरूणा ईरानी यांच्याबरोबर. प्राण त्यांचा बलात्कार करतील या भीतीनं त्यांच्यासोबत एकाच हॉटेलमध्ये राहण्यास त्यांनी नकार दिला होता. परंतु त्यानंतर रात्री अशी एक घटना घडली की ज्यामुळं रात्रभर त्यांना आपलं रडू आवरता आलं नाही.

    अरूणा इरानी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी हाँककाँग इथं गेल्या होत्या. त्या चित्रपटात प्राण खलनायकाच्या भूमिकेत झळकणार होते. दरम्यान ज्या हॉटेलमध्ये अरूणा यांची बुकिंग करण्यात आली होती. तिथं काही अडचणी आल्यामुळे त्यांना दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात आलं. प्राण देखील त्या हॉटेलमध्ये होते. शिवाय त्यांची खोली बरोबर प्राण यांच्या शेजारीच होती. त्यामुळं त्या प्रचंड घाबरल्या होत्या. त्यांच्या खोलीत घुसुन ते त्यांचा बलात्कार करतील अशी भीती त्यांना वाटत होती. कारण त्या काळी प्राण चित्रपटांमधील कृर कृत्यांसाठी प्रसिद्ध होते. अन् खऱ्या आयुष्यात देखील ते तसेच असतील असा गैरसमज त्यांना झाला होता. परंतु त्यांच्यामुळं कुठलाही त्रास झाला नाही. उलट काही मदत लागल्यास मला फोन कर असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यांचा हा दयाळूपणा पाहून अरुणा यांना स्वत:चीच लाज वाटू लागली. त्या रात्री अरूणा अक्षरश: ढसाढसा रडल्या होत्या. अन् सकाळ होताच त्यांनी प्राण यांची माफी मागितली.

    अरूणा यांनी ‘नर्तकी’, ‘गंगा की लहरे’, ‘फर्ज’, ‘उपकार’, ‘लैला मजनु’, ‘हम पाच’, ‘राजा बाबु’, बॉंम्बे टू गोवा ‘लाडला’, ‘सुहाग’ यांसारख्या ५०० हून अधिक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. त्यांनी चित्रपटांसोबतच मालिकांमध्येही काम केलं आहे. ५०० पेक्षा अधिक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या अभिनेत्री आहेत.