सुप्रसिद्ध ड्रमर जिमी कॉब यांचे निधन

न्यूयॉर्क : सुप्रसिद्ध ड्रमर जिमी कॉब यांचे कॅन्सरमुळे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. ते माईल्स डेविसचा १९५९ या वर्षी आलेला अल्बम ‘काईंड ऑफ ब्ल्यू’ चे शेवटचे सदस्य होते. त्यांचे रविवारी निधन झाले.

जिमी कॉब यांची पत्नी एलिना हीने फेसबुकवर जिमी यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांची कॅन्सरशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले. कॉब यांचा शेवटचा अल्बम ‘दिस आय डिग ऑफ यू’ ऑगस्ट २०१९ मध्ये रिलीज झाला होता.