अभिनेते माधव मोघे यांचं निधन, शोलेच्या ठाकूरची मिमीक्री करून मिळालेली प्रसिद्धी!

१९९३ साली त्यांनी ‘दामिनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सनी देओल, ऋषि कपूर, अमरीश पुरी आणि मीनाक्षी शेषाद्री या कलाकारांसोबत त्यांनी काम केलं होतं. याशिवाय काही मराठी चित्रपटांतही ते झळकले होते.

    प्रसिद्ध मिमीक्री आर्टिस्ट माधव मोघे यांचं ११ जुलैला निधन झालं होतं. त्यांना कॅन्सर झाला होता. प्रसिद्ध चित्रपट शोलेच्या ठाकूरची मिमीक्री करून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती. अनेक टीव्ही शोमध्ये त्यांनी काम केलं होतं. ते ६८ वर्षांचे होते.

    १९९३ साली त्यांनी ‘दामिनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सनी देओल, ऋषि कपूर, अमरीश पुरी आणि मीनाक्षी शेषाद्री या कलाकारांसोबत त्यांनी काम केलं होतं. याशिवाय काही मराठी चित्रपटांतही ते झळकले होते.

    ‘एमटीवी फुल्ली फालतू’ या शोमध्ये ही ते दिसले होते. याशिवाय ‘दामिनी’, ‘घातक’, ‘विनाशक’, और ‘पार्टनर’ अशा सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांत त्यांनी काम केलं होतं. उत्पल दत्त और राजकुमार यांचीही मिमीक्री ते करायचे. त्यांना संजीव कपूर यांची कॉपी असं म्हटलं जायचं.

    २०११ साली ‘जाना पहचान’ या चित्रपटात त्यांना शेवटचं चित्रपटात पाहिलं गेलं होतं. त्यानंतर ते चित्रपटांत जास्त दिसले नाहीत. गेले काही वर्षे ते कर्करोगाने ग्रस्त होते. माधव यांच्या पत्नीचंही काहीच दिवसांपूर्वी म्हणजे २१ जून ला निधन झालं होतं.