१४१ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी एकता कपूरच्या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्याला अटक!

अनुजने या याचिकेचा विरोध केला आहे. तो म्हणालाय की तो एक मेडिकल प्रॅक्टिशनर असून सध्या त्याच्या कंपनीत पीपीई किट आणि सॅनिटायझरची निर्मिती केली जातेय. सध्याच्या महामारीच्या काळात या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याने ही चौकशी पुढे ढकलण्यात यावी असं तो म्हणाला आहे.

    ‘कुसुम’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता आणि एल्डर या औषध निर्मिती कंपनीचा सीओओ अनुज सक्सेनाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक विभागाने ही कारवाई केलीय. गुंतवणूकदाराचे १४१ कोटी रुपये बुडवल्यच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आलीय. २०१२ ला अनुजने गुतवणूकीचा मोबदला देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप ते न मिळाल्याने त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली होती.

    मात्र अनुजने या याचिकेचा विरोध केला आहे. तो म्हणालाय की तो एक मेडिकल प्रॅक्टिशनर असून सध्या त्याच्या कंपनीत पीपीई किट आणि सॅनिटायझरची निर्मिती केली जातेय. सध्याच्या महामारीच्या काळात या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याने ही चौकशी पुढे ढकलण्यात यावी असं तो म्हणाला आहे. सोमवारपर्यंत अनुजला ईओडब्ल्यूनेच्या ताब्यात देण्यात आलंय.

    एकता कपूरच्या ‘कुसुम’ या मालिकेतून अनुज सक्सेनाने टेलिव्हिजनवर दमदार एण्ट्री केली होती. या मालिकेत त्याने अभय कपूरची भूमिका साकारली होती. कुमकुम, कुछ पल साथ तुम्हारा, सारा आकाश या मालिकांमध्ये त्याने महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.