फॅण्ड्रीतल्या शालूचा पुण्यातील गोल्डमॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल, राजेश्वरीचा दिसला ‘पावरी’ मूड!

या व्हिडीओत सगळ्याचं लक्ष वेधून घेतलंय ते राजेश्वरी सोबत असलेल्या एका गोल्डमॅनने. हा गोल्डमॅन कोण असा प्रश्न अनेकांना पडला. तर व्हिडीओतील गोल्डमॅनचं नाव आकाश मालव आहे. तो पुण्यातील एक व्यावसायिक आहे.

  सध्या सगळ्यांनाच पावरी ट्रेंडने वेड लावलं आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूडपर्यंत सगळे सध्या पावरीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टीव असणारी राजेश्वरी म्हणजेच फॅण्ड्री चित्रपटातील शालूही ट्रेंडमध्ये सामील झाली आहे. राजेश्वरी खरातनेदेखील ‘पावरी’चा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

   

  एका सोनेरी रंगाच्या ऑडी कारसोबत राजेश्वरीने हा व्हिडीओ केलाय. “ये हमारी कार है..ये हम है..और हमारी पावरी हो रही है” असं म्हणत राजेश्वरीने व्हिडीओ शेअर केलाय. एका इव्हेंटनंतरचा हा व्हिडीओ असल्याचं लक्षात येतंय. ‘या ट्रेंडसाठी थोडा उशिरच झाला..पण हे जबरदस्त आहे’ असं कॅप्शन देत राजेश्वरीने धमाल करतानाचा व्हिडीओ शेअर केलाय.

   

  फँण्ड्री फेम राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतेय. राजेश्वरीचे रोज नवे व्हिडीओ व्हायरल होत आहे. ग्लॅमरस फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत राजेश्वरीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहतेदेखील तुफान लाईकस् देत आहेत.

   

  कोण आहे गोल्डमॅन

  या व्हिडीओत सगळ्याचं लक्ष वेधून घेतलंय ते राजेश्वरी सोबत असलेल्या एका गोल्डमॅनने. हा गोल्डमॅन कोण असा प्रश्न अनेकांना पडला. तर व्हिडीओतील गोल्डमॅनचं नाव आकाश मालव आहे. तो पुण्यातील एक व्यावसायिक आहे.