फ्रॅण्ड्रीतील जब्याच्या सोज्वळ शालूचा सोशल मीडियावर हॉट अंदाज, राजश्रीचं हे रूप बघून चाहत्यांचा ‘जीव झाला येडा पीसा’!

नुकताच शालूने सोशल मीडियावर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शालू ‘बहुत कठिन है डगर पनघट की’ या जान्हवी कपूरच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे

    नागराज मंजुळे यांच्या फँड्री चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. तिने पहिल्याच चित्रपटामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. काही दिवस ही शालू अभिनय क्षेत्रापासून थोडी दूर गेली होती. मात्र, आता परत एकदा शालू चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर शालूने तिच्या अदांनी अनेकांना घायाळ केलं आहे.

    नुकताच शालूने सोशल मीडियावर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शालू ‘बहुत कठिन है डगर पनघट की’ या जान्हवी कपूरच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. नागराज मंजुळेना फँड्री चित्रपटात जो चेहरा पाहिजे होता तो त्यांना राजेश्वरीच्या रूपाने मिळाला. राजेश्वरीने देखील आपल्या उत्तम अभिनयातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, फँड्री शालूचे आताचे रूप पाहिले की चाहत्यांना विश्वासच बसत नाही.

    फँड्री चित्रपटात शालूची भूमिका साकरणाऱ्या राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजेश्वरी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. राजेश्वरीच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय आणि शालूचा हा बदलेला अंदाज चाहत्यांना जबरदस्त आवडलेला दिसत आहे.