हॅण्डसम हंकच्या गंभीर फोटोवर चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स, मग काय हृतिक रोशनही दिले झक्कास रिप्लाय!

काही तासांतच जवळपास १.५ मिलीयन कमेंट्स त्याच्या या पोस्टवर आल्या आहेत. हृतिकची ‘कोई मिल गया’ चित्रपटातली सहकलाकार प्रीती झिंटा, टायगर श्रॉफ आणि हुमा कुरेशी यांनी देखील या पोटोवर कमेंट्स केल्या आहेत.

  अभिनेता हृतिक रोशनच्या चाहत्यांची संख्या तसूभरही कमी झाली नाही. आजही त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतेच त्याने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो तुफान व्हायरल होत आहेत. घरी होत असलेल्या एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यानचे हे फोटो असावेत. या फोटोंनाही चाहत्यांनी पसंती दिली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

  यात तो फारच लक्ष देऊन लॅपटॉपमध्ये काहीतरी बघत आहे. हा फोटो शेअर करत तो म्हणतो, “माझ्या सिरीयस चेहऱ्याकडे पाहून भुलू नका. तो मेन्यू आहे.” त्याचसोबत त्याने असे हॅशटॅग्जही दिले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

   

  काही तासांतच जवळपास १.५ मिलीयन कमेंट्स त्याच्या या पोस्टवर आल्या आहेत. हृतिकची ‘कोई मिल गया’ चित्रपटातली सहकलाकार प्रीती झिंटा, टायगर श्रॉफ आणि हुमा कुरेशी यांनी देखील या पोटोवर कमेंट्स केल्या आहेत. त्याचे वडील आणि चित्रपट निर्माते राकेश रोशन यांनीही त्याच्या या फोटोवर कमेंट केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

  चाहत्यांशी मजेशीर संवाद

  त्याच्या चाहत्यांना तर तो समोसा खात असेल यावर विश्वासच बसत नाही. एकाने कमेंट केली आहे, “तुला असं वाटत आहे की तू समोसा खातोस यावर आमचा विश्वास बसेल?” त्याच्या या कमेंटला हृतिकने उत्तरही दिलं आहे. त्यात तो म्हणतो, “अजून काही चांगलं आहे का?” अजून एक चाहता म्हणतो, “तुझं नाक इतकं तीक्ष्ण आहे की तू खरंच समोस्यासाठीचे बटाटे कापू शकशील.” त्यावरही हृतिक म्हणतो, “नक्कीच पण त्याने माझ्या नाकपुड्या बंद पडतील.”