फरहान अख्तरचा रोमॅण्टिक लूक चाहत्यांना भावला, ‘तूफान’ चं पोस्टर रिलीज!

अभिनेता फरहान अख्तर याने स्वतःच्या त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बहूप्रतिक्षित ‘तूफान’ चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज केले आहेत. दोन्ही पोस्टरमध्ये अभिनेता फरहानचे दोन वेगवेगळे लूक पहायला मिळतात.

    अभिनेता फरहान अख्तर पुन्हा एकदा स्पोर्ट्स ड्रामा फिल् तूफान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही वेळापूर्वीच या चित्रपटाचा रोमॅण्टिक पोस्टर रिलीज करण्यात आलाय. या पोस्टरमधून त्यांनी चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची देखील घोषणा केलीये. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार होता. मात्र, आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

    अभिनेता फरहान अख्तर याने स्वतःच्या त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बहूप्रतिक्षित ‘तूफान’ चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज केले आहेत. दोन्ही पोस्टरमध्ये अभिनेता फरहानचे दोन वेगवेगळे लूक पहायला मिळतात. पहिल्या रोमॅण्टिक पोस्टरमध्ये फरहानसोबत अभिनेत्री मृणाल ठाकुर आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये फरहान बॉक्सिंग करताना दिसत आहे. हे दोन्ही पोस्टर शेअर करताना फरहानने एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात त्याने लिहिलंय, “आयुष्य तुम्हाला तोपर्यंत खचू देत नाही जोपर्यंत तुम्ही प्रेमाने बांधलेले असता…३० जूनला ट्रेलर आऊट होतोय.”

    ‘तूफान’चा ट्रेलर आता ३० जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांच्याद्वारे करण्यात आली आहे. ‘तूफान’चे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले असून फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहे.