‘चित्रपटात काम हवं असेल तर माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेव’,अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचा धक्कादायक अनुभव!

फातिमाने आपल्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. जेव्हा एका माणसाने तिला मारलं होतं त्यावेळी तिच्या वडिलांनी कसा धडा शिकवला ते सांगितलं आहे

    अभिनेत्री फातिमा सना शेखने नुकताच एका मुलाखतीत आफल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी तीने तीचे कुटुंब, कास्टिंग काऊच अशा अनेक गोष्टींबद्दल सांगितलं.

    फातिमाने बालकलाकार म्हणूनही काम केलं आहे. तिच्या या क्षेत्रातल्या अनुभवांबद्दल बोलताना आपल्याला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागल्याचंही तिने सांगितलं. ती म्हणते, “माझ्यासमोर असे अनेक प्रसंग आले की ज्यावेळी मला सांगितलं गेलं की तुला जर काम हवं असेल तर तुला शरीरसंबंध ठेवावे लागतील”.

    ती म्हणाली की तिचा परिवार तिचा सर्वात मोठा आधार आहे. फातिमाने आपल्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. जेव्हा एका माणसाने तिला मारलं होतं त्यावेळी तिच्या वडिलांनी कसा धडा शिकवला ते सांगितलं आहे. फातिमा जेव्हा जिमवरुन परत येत होती त्यावेळी तिला लक्षात आलं की एक माणूस तिच्याकडे एकटक पाहात आहे.

    मी जिमनंतर रस्त्यावरुन चालले होते. एक मुलगा पुढे आला आणि तो माझ्याकडे एकटक पाहत होता. मग मी त्याला विचारलं की काय बघतोयस तर तो म्हणाला माझी मर्जी मला वाटेल तर मी बघेन. तर मी त्याला मार खाशील का असं विचारलं तर त्यावर तो मार असंही म्हणाला. मी त्याला थोबाडीत मारली तर त्याने मला बुक्की मारली. मला काही वेळ काही दिसतच नव्हतं. मी सर्वात आधी माझ्या वडिलांना बोलावलं आणि त्यांना घडलेला सगळा प्रसंग सांगितला. ते आणखी दोन-तीन लोकांना घेऊन आले. माझे वडील, भाऊ आणि त्यांच्या मित्रांना पाहून तो मुलगा पळून गेला”.