कोरोनामुळे चित्रपटसृष्टीने मावळा गमावला, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने वाहिली श्रद्धांजली!

हीच दिवसांपूर्वी अभिनेते अमोल धावडे यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. अवघ्या १५ दिवसात झालेल्या कोरोना संक्रमणानं त्यांचा मृत्यू झाला होता. अभिनेते दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली होती.

  देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. कोरोनाची ही दुसरी लाट अतिशय विध्वंसक ठरली आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत अनेक कलाकारांनी देखील आपला जीव गमावला आहे. ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘फर्जंद’ सारख्या चित्रपटांत झळकलेले अभिनेते नवनाथ गायकवाडचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

  फर्जंद आणि फत्तेशिकस्त मध्ये काम केलेल्या नवनाथ गायकवाड या एका अत्यंत गुणी आणि मेहनती कलाकाराचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले.
  त्याच्या आत्म्यास सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..
  🙏🙏

  Posted by Digpal Lanjekar on Saturday, May 1, 2021

  ‘फर्जंद आणि फत्तेशिकस्त मध्ये काम केलेल्या नवनाथ गायकवाड या एका अत्यंत गुणी आणि मेहनती कलाकाराचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. त्याच्या आत्म्यास सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..’, अशी पोस्ट लिहिती ‘फत्तेशिकस्त’चे लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

  काहीच दिवसांपूर्वी अभिनेते अमोल धावडे यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. अवघ्या १५ दिवसात झालेल्या कोरोना संक्रमणानं त्यांचा मृत्यू झाला होता. अभिनेते दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली होती. अभिनेते अमोल धावडे हे प्रवीण तरडे यांचे जवळचे मित्र होते. ‘देऊळबंद’ , ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटांमध्ये ते झळकले होते.