आई- वडिलांनी मुलगा इराणी दिग्दर्शकाची केली निर्घुण हत्या, शरीराचे तुकडे जमा केले पिशवीत आणि…

बेशुद्ध अवस्थेतच वडिलांनी त्यांच्यावर चाकूने वार करत हत्या केली. त्यांच्या शरीराचे तुकडे केले. त्यांना कचऱ्याच्या पिशवीत ठेवलं.

    प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक बाबक खोरामदिन यांची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या आई- वडिलांनी मिळून त्यांची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली असून हा प्रकार ऑनर किलिंगचा असल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

    एका वृत्तानुसार बाबक गेली अनेक वर्ष इंग्लंड इथं वास्तव्य करत होते. मात्र अचाकन त्यांनी इंग्लंड सोडलं व ते आपल्या आई-वडिलांकडे राहायला आले. बाबक अविवाहित होते. त्यामुळं त्यांच्या लग्नावरुन अनेकदा आई-वडिलांसोबत वाद व्हायचे. शेवटी या सततच्या वादांना कंटाळून पालकांनीच त्यांची हत्या केली. त्यांना कॉफीमधून गुंगीचं औषध दिलं. परिणामी बाबक बेशुद्ध झाले. अन् त्या बेशुद्ध अवस्थेतच वडिलांनी त्यांच्यावर चाकूने वार करत हत्या केली. त्यांच्या शरीराचे तुकडे केले. त्यांना कचऱ्याच्या पिशवीत ठेवलं.

    मात्र ही पिशवी पोलिसांच्या हाती लागली. अन् पोलिसांनी खरं प्रकरण शोधून काढलं. अखेर पोलिसांसमोर आई-वडिलांना आपला गुन्हा कबुल केला.

    त्याची लाज वाटायची

    बाबक अविवाहित होते. मुलामुळं त्यांना मानसिक त्रास होत होता. तो सतत त्यांचा अपमान करायचा. यामुळं घराबाहेर पडायचीही त्यांना लाज वाटायची त्यामुळं त्यांनी आपल्या मुलाची हत्या केली असा दावा गुन्हेगार आई-वडिलांनी केला आहे. दरम्यान बाबक यांच्या मृत्यूमुळं इराणी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.