kedar shinde

केदार शिंदे यांच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत. काहींना त्यांच म्हणणं पटलं आहे तर काहींनी त्याच्या या पोस्टवर नापसंती दर्शवली आहे. केदार शिंदे हे अनेकदा सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करत असतात.

    देशात दिवसेंदिवस कोरोना कहर वाढत आहे. लस, ऑक्सिजनची कमतरता मोठ्याप्रमाणावर भासत आहे. सगळेच हवालदिल आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांची एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय. ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष…, असे म्हणत त्यांनी मर्मावर नेमके बोट ठेवले आहे.

    भविष्यात वीज/गॅस प्रमाणे #Oxygen वापराचं बील आलं तर आश्चर्य वाटायला नको.. स्वातंत्र्य म्हणजे मोकळा श्वास पण, दुर्दैवाने आपल्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी तो मोकळा श्वास सुध्दा आपल्याला सहजासहजी उपलब्ध करून दिला नाही. ब्रिटिश हवे होते अजून काही वर्ष..आता ते हवे होते म्हणजे… किमान या जगण्याच्या महत्वाच्या सोई तरी व्यवस्थीत करून दिल्या असत्या.

    केदार शिंदे यांच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत. काहींना त्यांच म्हणणं पटलं आहे तर काहींनी त्याच्या या पोस्टवर नापसंती दर्शवली आहे. केदार शिंदे हे अनेकदा सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करत असतात.

    अगं बाई अरेच्चा, जत्रा, यंदा कर्तव्य आहे,  गलगले निघाले, बकुळा नामदेव घोटाळे,  इरादा पक्का  अशा विविध मराठी सिनेमातून केदार शिंदे यांनी दिग्दर्शक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. सही रे सही,  लोचा झाला रे, श्रीमंत दामोदरपंत ही जबरदस्त नाटकं प्रेक्षकांना दिली. याशिवाय हसा चकट फू, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय आणि आता सुरू असणारी सुखी माणसाचा सदरा या मालिकांमधून त्यांनी छोट्या पडद्यावरही ओळख निर्माण केली आहे.