शेफाली शहा दिग्दर्शित ‘हैप्पी बर्थडे मम्मी जी’च्या चित्रीकरणाला सुरुवात!

आपला पहिला लघुपट 'समडे'च्या प्रदर्शनाआधीच, शेफाली शहाने (Shefali Shah ) आपल्या दुसऱ्या लघुपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे, ज्याचे नाव 'हैप्पी बर्थडे मम्मी जी’ ('Happy Birthday Mummy ji' ) असे असून त्याची निर्मिती सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडद्वारा करण्यात आली आहे.

आपला पहिला लघुपट ‘समडे’च्या प्रदर्शनाआधीच, शेफाली शहाने (Shefali Shah ) आपल्या दुसऱ्या लघुपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे, ज्याचे नाव ‘हैप्पी बर्थडे मम्मी जी’ (‘Happy Birthday Mummy ji’ ) असे असून त्याची निर्मिती सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडद्वारा करण्यात आली आहे. नुकतेच, चित्रपट निर्मात्यांनी लवकरच याच्या अधिकृत घोषणेचे (Announcement)संकेत देतानाच, या लघुपटाचे सेटवरील काही ऑन-लोकेशन फोटो (Photo Share) शेअर केले होते. आता, शेफाली आपल्या सोशल मीडियावर (Social Media) ‘हैप्पी बर्थडे मम्मी जी’चा क्लॅप बोर्ड हातात घेताना दिसत आहे.

याबाबत एक पोस्ट शेअर करताना, शेफालीने लिहिले की, “In the habit of having babies in twos!!! 2 real, 2 rolly polly and 2 reel.”


शेफाली शहा, या वर्षी सप्टेंबरमध्ये ‘समडे’ या लघुपटासोबत दिग्दर्शकाच्या खुर्चीत विराजमान झाली आहे. या लघुपटाची कथा तिने नुकतीच या कोविड-१९ च्या काळात लिहिली असून यात तिने अभिनय देखील केला आहे. जेव्हा, ‘समडे’ आपल्या वैयक्तिक त्रासासोबत झुंजणाऱ्या एक फ्रंट लाइन योद्धा आणि आइसोलेशन याबाबतची कहाणी आहे, तर ‘हैप्पी बर्थडे मम्मी जी’मध्ये आइसोलेशनवर पूर्णपणे विपरीत भाष्य करण्यात आले आहे. हा एक मजेदार, हल्का-फुल्का लघुपट असून लघुपटाच्या शेवटी एक महत्त्वाचा विचार देण्यात आला आहे.