vijay deverkonda

टॉलीवूडमधील एक प्रसिद्ध नाव, निर्माता-वितरक अभिषेक नामा यांनी विजय देवरकोंडावर मोठा आरोप लावला आहे. चित्रपट निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार विजय हा खूपच अनप्रोफेशनल अभिनेता आहे

  दाक्षिणात्य सिनेमाचा सुपर स्टार ‘गीता गोविंदम’ फेम अभिनेता विजय देवेराकोंडा लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतोय. या अभिनेत्याने आतापर्यंत मोठ्या पडद्यावर अनेक सुपर हिट चित्रपट दिले आहेत. छोट्या कारकीर्दीतही विजयचं फॅन फॉलोईंग खूप मोठं आहे. मात्र, आता विजयविषयी एक धक्कादायक बातमी आली आहे. चित्रपट निर्मात्याने विजयवर मोठा आरोप केले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

  टॉलीवूडमधील एक प्रसिद्ध नाव, निर्माता-वितरक अभिषेक नामा यांनी विजय देवरकोंडावर मोठा आरोप लावला आहे. चित्रपट निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार विजय हा खूपच अनप्रोफेशनल अभिनेता आहे. निर्माता-वितरक अभिषेक नामाने अलीकडेच ‘वर्ल्ड फेमस लव्हार’ या चित्रपटाचे हक्क विकत घेतले होते. अशा परिस्थितीत अभिषेक नामा म्हणाले की, ‘वर्ल्ड फेमस लव्हर’चे हक्क विकत घेणे माझ्यासाठी आपत्ती होती.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

  या चित्रपटात जितकी गुंतवणूकी केली आहे, त्यापैकी हा चित्रपट दहा टक्के रक्कमही गोळा करू शकला नाहीय. चित्रपटाच्या या अनपेक्षित निकालानंतर विजय देवेराकोंडाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. अशा परिस्थितीत अभिनेत्याच्या अशा वागण्याने त्यांना अतिशय वाईट वाटले आहे. २०२०च्या ‘वर्ल्ड फेमस लव्हर’ या चित्रपटात विजय मुख्य भूमिकेत होता.

  अभिषेक नामा यांनी असा दावा केला आहे की, विजय देवेराकोंडा याने त्यांच्या कोणत्याही कॉलला उत्तर दिले नाही. त्यांनी चित्रपटात केलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी १०% गुंतवणूकही अद्याप वसूल झालेली नाही. यासह, अभिनेत्याच्या अशा वर्तनामुळे तो खूप दुखावला गेला आहे. जेव्हा एखादा चित्रपट आपली जादू दाखवण्यात अयशस्वी होतो, तेव्हा ही फिल्ममेकर्स आणि वितरकांची जबाबदारी असते. परंतु, तिच्या यशाचे संपूर्ण श्रेय मात्र नायकाला जाते.