‘स्पर्धकाच्या गाण्यांपेक्षा त्यांना गरीब दाखवण्यात जास्त इंट्रेस्ट’, इंडियन आयडल अभिजीत सावंतने केले अनेक खुलासे!

यावेळी अभिजीतने एक अनुभव शेअर केलाय, “मला आठवतंय एका माझा परफॉर्मन्स सुरू असताना मी गाण्यांचे शब्द विसरलो आणि मी गाणं थांबवलं. मात्र त्यावेळी जजेसनी एकत्रीत निर्णय घेत मला पुन्हा गाण्याची संधी दिली.

  ‘इंडियन आयडल-१२’ हा शो गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आहे. किशोर कुमार स्पेशल एपिसोडनंतर या शोची चांगलीच चर्चा रंगली. किशोर कुमार स्पेशल एपिसोडमध्ये हजेरी लावल्यानंतर अमित कुमार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या आहेत. शोमधील पवनदीप रंजन आणि अरुनिता कंजीलाल यांची दाखवण्यात आलेली लव्ह स्टोरी फेक असल्याचं समोर आल्यानंतर अनेकांनी या शोवर टीका केली. इंडियन आयडलच्या पहिल्या पर्वाचा विजेता मराठमोळा गायक अभिजीत सावंतने रिअ‍ॅलिटी शोवर त्याचं मत मांडलंय.

  अभिजीत सावंतने रिअलिटी शोच्या बदलत्या ट्रेंडवर नाराजी व्यक्त केली आहे. अभिजीतने आपलं मत एक व्हिडिओ शेअर करत मांडलं आहे, अभिजीत म्हणाला, आजकाल मेकर्सना स्पर्धकाच्या टॅलेन्टपेक्षा तसचं त्याच्यातील गुणांपेक्षा त्याला बूट पॉलिश करता येतात का किंवा तो किती गरबी आहे, किंवा याचं आयुष्य किती संघर्षमय आहेत हे दाखवण्यात जास्त रस असतो. प्रादेशिक शोमध्ये स्पर्धकाच्या गायनाला अधिक प्राधान्य दिलं जातं मात्र हिंदी शोमध्ये स्पर्धकाच्या खडतर आयुष्याला जास्त महत्व दिलं जातं. आता तर शोमध्ये लव्ह स्टोरी दाखवल्या जातात. ” असं म्हणत अभिजीतने खंत व्यक्त केलीय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Abhijeet Sawant (@abhijeetsawant73)

  यावेळी अभिजीतने एक अनुभव शेअर केलाय, “मला आठवतंय एका माझा परफॉर्मन्स सुरू असताना मी गाण्यांचे शब्द विसरलो आणि मी गाणं थांबवलं. मात्र त्यावेळी जजेसनी एकत्रीत निर्णय घेत मला पुन्हा गाण्याची संधी दिली. मात्र हे आताच्या काळात झालं तर नक्कीच अशा प्रसंगाला एखादा शॉक इफेक्ट किंवा वीज कोसळल्याचा इफेक्ट देऊन प्रेक्षकांसमोर मांडलं असतं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Abhijeet Sawant (@abhijeetsawant73)

  तर कुशोर कुमार स्पेशल एपिसोडबद्दल बोलताना कोणत्याही गायकाची किशोर कुमार यांच्यासारख्या दिग्गज गायकासोबत तुलना करणं चुकीचं असल्याचं तो म्हणाला. प्रत्येकाची गायनाची वेगळी स्टाईल असून प्रत्येकजण आपल्या स्टाईलने आदरांजली देऊ शकतो असंही तो म्हणाला.