अमेझॉन प्राईम व्हिडिओची आगामी सीरीज ”ब्रीद: इन द शॅडोज” मधील अभिषेक बच्चनचा फर्स्ट लूक प्रदर्शित

अबुदंतिया एंटरटेनमेंट निर्मित, मनोवैज्ञानिक क्राइम थ्रिलरसोबत अभिषेक बच्चन आपला डिजिटल डेब्यू करत आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओ 'ब्रीद: इन टू द शॅडोज'ची मागच्या आठवड्यात प्रदर्शनाच्या तारखेची

 अबुदंतिया एंटरटेनमेंट निर्मित, मनोवैज्ञानिक क्राइम थ्रिलरसोबत अभिषेक बच्चन आपला डिजिटल डेब्यू करत आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओ ‘ब्रीद: इन टू द शॅडोज’ची मागच्या आठवड्यात प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर आज, अमेझॉन प्राईम व्हिडिओने आपल्या बहुप्रतीक्षित सीरीजमधील अभिषेक बच्चनचा फर्स्ट लूक सादर केला. या मालिकेत अभिषेक बच्चनच्या पहिल्या लूकमध्ये एक गडद आणि तीव्र मनःस्थिती दर्शविली गेली आहे, जेथे तो एका हरवलेल्या मुलाच्या पोस्टरकडे एक गहन दृष्टीक्षेप टाकताना दिसतो आहे. 

आपल्या या फर्स्ट लुकविषयी बोलताना, अभिनेता अभिषेक बच्चन म्हणाला की, अमेझॉन ओरिजिनल ‘ब्रीद: इन टू द शॅडोज’ सोबत डिजिटल ऑन-स्क्रीन डेब्यूसाठी मी सुरुवातीपासूनच उत्सुक आहे. मागच्या शुक्रवारी जेव्हा या शोच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख घोषित झाली तेव्हापासून तर मी अधिकच उत्साहित झालो आहे कारण तेव्हापासून मला दर्शकांचे प्रेम आणि जो पाठींबा मिळतो आहे, त्यामुळे नव्या दर्शकांसोबत जोडले जाण्याचा विश्वास दृढ होत आहे. मी माझ्या पहिल्या डिजिटल सिरीजच्या प्रदर्शनासाठी आनंदित आहे, जो एक रोमांचक आणि शैली-परिभाषित कंटेंटचे एक आदर्श उदाहरण आहे, ज्याला आपण आपल्या सुविधेनुसार पाहू शकणार आहोत. मी निश्चितपणे येणाऱ्या दिवसांची आतुरतेने वाट पाहतो आहे, कारण येत्या दिवसांमध्ये आम्ही जगासमोर  ‘ब्रीद: इन टू द शॅडोज’चे रहस्य उलगडणार आहोत.

अमेझॉन प्राईम व्हिडिओची ऑरिजिनल सीरिज ‘ब्रीद’ चा बहुप्रतीक्षित नवीन सीजन १० जुलै २०२० ला प्रदर्शित होणार आहे. सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर ‘ब्रीद: इन द शॅडोज’ चे दिग्दर्शन मयंक शर्मा यांनी केले आहे. या शो ला भवानी अय्यर, विक्रम तुली, अरशद सैयद आणि मयंक शर्मा यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने लिहिले आहे. या सीरीज द्वारे बॉलीवुड सुपरस्टार अभिषेक बच्चन आपला डिजिटल डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला असून अभिनेता अमित साध पुन्हा एकदा आपली पुरस्कार विजेता भूमिका सीनियर इन्स्पेक्टर कबीर सावंत साकारताना दिसणार आहे. या सिरीजमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री निथ्या मेननदेखील आपला डिजिटल डेब्यू करणार असून सैयामी खेर देखील एक प्रमुख व्यक्तिरेखेत झळकणार आहे. ही बहुप्रतीक्षित अमेझॉन ओरिजिनल सीरीज जगभरातील २०० हून अधिक देश आणि प्रदेशात विशेष करून अमेझॉन प्राईम व्हिडिओवर लॉन्च होणार आहे. या शोच्या ट्रेलरचे अनावरण १ जुलै २०२० करण्यात येणार आहे.