अमेय वाघ-ललित प्रभाकर स्टारर ‘झोंबिवली’ सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित

  • दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर युथ स्टार्स अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. झोंबिवली या सिनेमाचा मुहूर्त नुकताच मुंबई येथे पार पडला आणि या सिनेमातील काही सीन्सचे शूटिंग लवकरच लातूर येथे होणार आहे.

मराठी सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली असून प्रेक्षकांचं आगळ्या-वेगळ्या पध्दतीने मनोरंजन करण्यासाठी एक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नाव झोंबिवली असं आहे. या सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर नुकतचं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर युथ स्टार्स अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. झोंबिवली या सिनेमाचा मुहूर्त नुकताच मुंबई येथे पार पडला आणि या सिनेमातील काही सीन्सचे शूटिंग लवकरच लातूर येथे होणार आहे.

प्रेक्षकांना एक प्रश्न नक्की पडला असेल की, या सिनेमाचं नाव डोंबिवली का नाही…झोंबिवलीचं का? यासाठी प्रेक्षकांना आणि खास करून तरूण पिढीला हा सिनेमा पाहणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु डोंबिवलीमधील झोंबिज असे कनेक्शन असल्यामुळे या सिनेमाचं नाव झोंबिवली असे देण्यात आले. असं म्हटलं जात आहे. प्रेक्षकांना या सिनेमात हॉरर आणि कॉमेडी या दोन्ही गोष्टींचं उत्तम समीकरण पाहायला मिळणार आहे. तसेच झोंबिवली हा सिनेमा आगामी वर्षात प्रदर्शित होणार आहे.