सुपरस्टार प्रभासच्या ‘आदिपुरूष’ सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित

आदिपुरूष एक ३डी एक्शन सिनेमा आहे. टी सीरिज निर्मित आणि ओम राऊत दिग्दर्शित हा सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगतिलं जात आहे. आदीपुरूष हा सिनेमा हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड अशा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेलुगू सुपरस्टार प्रभासने साऊथ इंडस्ट्रीला एका वेगळ्याचं उंचीवर नेऊन ठेवलं आहे. प्रभासने सोशल मीडियावर या सिनेमाची घोषणा केली असता, त्याच्या चाहत्यांकडून या पोस्टरला प्रचंड प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे.

बाहुबली फेम तेलुगू सुपरस्टार प्रभासचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नाव आदिपुरूष असं आहे. नुकतेच या सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच या सिनेमाचा पोस्टर प्रभासने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तान्हाजी-द अनसंग वॉरिअर या सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत यांच्यासह प्रभास काम करणार आहे. तसेच तो सिनेमाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 

Celebrating the victory of good over evil! #Adipurush @omraut @bhushankumar @vfxwaala @rajeshnair29 @tseriesfilms @retrophiles1 @tseries.official #TSeries

A post shared by Prabhas (@actorprabhas) on

आदिपुरूष एक ३डी एक्शन सिनेमा आहे. टी सीरिज निर्मित आणि ओम राऊत दिग्दर्शित हा सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगतिलं जात आहे. आदीपुरूष हा सिनेमा हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड अशा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेलुगू सुपरस्टार प्रभासने साऊथ इंडस्ट्रीला एका वेगळ्याचं उंचीवर नेऊन ठेवलं आहे. प्रभासने सोशल मीडियावर या सिनेमाची घोषणा केली असता, त्याच्या चाहत्यांकडून या पोस्टरला प्रचंड प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. ‘वाईटावर सत्याचा विजय’ अशी या सिनेमाची आकर्षक टॅगलाईन आहे. काही वेळातच या पोस्टरवर लाईक्सचा वर्षाव झाला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 

Are you ready for tomorrow? 7.11 am Hope you like it @omraut @bhushankumar @vfxwaala @rajeshnair29 @tseriesfilms @retrophiles1 @tseries.official #TSeries

A post shared by Prabhas (@actorprabhas) on

प्रभास आणि ओम राऊत या सिनेमाच्या निमित्ताने इंन्स्टाग्रामवर लाईव्ह आले होते. तसेच त्यांनी एकमेकाशी संवाद साधला. प्रभासच्या या व्हिडिओला भरपूर लोकांनी पसंती दर्शवली आहे. परंतु प्रभास व्यतिरिक्त या सिनेमात अजून कोणता अभिनेता आणि अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.