कंगनाच्या सुरक्षेसाठी तिच्या आईने केला महामृत्युंजय मंत्राचा जप

आपल्या बिंदास्त स्वभावामुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगना नेहमीच चर्चेत असते. चुकीच्या गोष्टींचे कंगना नेहमीच समर्थन करताना दिसते.

आपल्या बिंदास्त स्वभावामुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगना नेहमीच चर्चेत असते. चुकीच्या गोष्टींचे कंगना नेहमीच समर्थन करताना दिसते. त्यामुळे ती अनेक लोकांविरुद्ध बोलताना दिसत असते. तिच्या याचं दृष्टीकोनामुळे तिची आई नेहमी तिच्या सुरक्षेसाठी चिंतेत असते. यामुळे तिच्या आईने मुलीच्या सुरक्षेसाठी महामृत्युंजय मंत्रचा जप करून घेतला आहे. कंगनाने याबाबतची माहिती ट्विट करत आपल्या चाहत्यांना दिली. 

कंगनाने व्हिडिओसह ट्विट करत लिहिले आहे की, माताजी माझ्या सुरक्षेसाठी चिंतते असतात, यामुळेच त्यांनी एक लाख पंधरा हजार वेळा महामृत्युंजय मंत्र जप करून घेतला. हा कार्यक्रम आज समाप्त झाला, मी माझ्या कुटुंबाला धन्यवाद देते. कंगना भाजप समर्थक म्हणून ओळखली जाते यामुळे ती अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होत असते.