अभिनेत्री जूही चावलाला हायकोर्टाचा दणका, ठोठावला २० लाखांचा दंड कारण…

कोर्टाने जुही चावलाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणात याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केला हायकोर्टाने म्हटलं आहे.

    जूही २० लाखांचा मोठा दंड ठोठावण्यात दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी 5G रोल आऊटविरोधात तिची याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टाने जुही चावलाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणात याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केला हायकोर्टाने पुढे असेही म्हटले की, या प्रकरणात असे दिसते आहे की याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल केली गेली आहे, म्हणूनच याची लिंक सोशल मीडियावर शेअर केली गेली.

    कोर्टाने उपस्थित केला प्रश्न

    यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी (२ जून) जुही चावला, सरकारला निवेदन न देता 5G वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञानाला आव्हान देण्यासाठी थेट कोर्टात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. तंत्रज्ञान संबंधित तिच्या चिंतेबाबत सरकारला कोणतेही निवेदन न देता, जुही चावला यांनी देशात 5 जी वायरलेस नेटवर्क स्थापित करण्याच्या विरोधात थेट दावा दाखल करण्यासंदर्भातही हायकोर्टाने प्रश्न केला होता

    काय आहे याचिकेत

    जुही चावला म्हणाली की, या 5जी योजनांमुळे मानवांवर गंभीर, अपरिवर्तनीय परिणाम होतो आणि पृथ्वीवरील पर्यावरणाचे कायमचे नुकसान होण्याचा धोका आहे. अॅमडव्होकेट दीपक खोसला यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती केली होती की, 5 जी तंत्रज्ञान मानवजातीसाठी, पुरुष, स्त्री, प्रौढ, लहान मुलं, अर्भक, प्राणी आणि सर्व प्रकारच्या जीव-जंतुंसाठी सुरक्षित आहे का हे स्पष्ट करावं.