शकुन बत्रांच्या आगामी चित्रपटासाठी दीपिका गोव्याला होणार रवाना

अभिनेत्री दीपिका पादुकोण(deepika padukone) लवकरच शकुन बत्राच्या(shakun batra) आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा आणि इतर माहिती सध्या गुलदस्त्यात असली तरीही हाती आलेल्या माहितीनुसार दीपिका ११ सप्टेंबरला या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी(film shooting) मुंबईहून गोव्याला(bombay to goa) रवाना होणार आहे.

आमच्या सूत्रांनुसार, दीपिका मुंबईतील आपल्या ब्रँड कमिटमेंट पूर्ण करून ११ सप्टेंबरला गोव्यासाठी निघेल. टीम एकत्र येऊन चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीची पूर्व तयारी पूर्ण करतील आणि काही दिवसातच चित्रीकरण सुरू करण्यात येईल.

लॉकडाऊनच्या दरम्यान, दीपिकाने आपल्या व्यक्तिरेखेच्या तयारीसाठी काही ऑनलाईन योग सेशन्समध्ये देखील भाग घेतला होता. मात्र, तिच्या व्यक्तिरेखेविषयी आणि चित्रपटाविषयीची इतर माहिती निर्मात्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहे.

शकुनच्या या चित्रपटाव्यतिरिक्त, दीपिका ‘इंटर्न’चा रीमेक आणि नाग अश्विनद्वारे दिग्दर्शित प्रभास सोबत एका चित्रपटात दिसणार आहे जो संपूर्ण भारतात प्रदर्शित होणारा बहुभाषी प्रॉजेक्ट असणार आहे. आणखी एक चित्रपट द्रौपदी मध्ये देखील ती दिसणार आहे.