‘स्‍लमडॉग मिलेनियर’मधील अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई, बेबी बम्पबरोबर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज!

फ्रीडाने सोशल मीडियाद्वारे गूड न्यूज दिल्यानंतर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. फ्रीडाने फोटोग्राफर कॉरी ट्रॅनसोबत २०१९मध्ये साखरपुडा केला.

    बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे स्लमडॉग मिलेनियर. या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री फ्रीडा पिंटोने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता पुन्हा एकदा फ्रीडा चर्चेत आली आहे. फ्रिडा लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियाद्वार फोटो पोस्ट करत तिने ही बातमी दिली.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Freida Pinto (@freidapinto)

    फ्रीडाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर होणारा पती कॉरी ट्रॅनसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये फ्रीडा प्रेग्नंट असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लवकरच तिच्या बाळाचा जन्म होणार आहे या आशयाचे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Freida Pinto (@freidapinto)

    फ्रीडाने सोशल मीडियाद्वारे गूड न्यूज दिल्यानंतर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. फ्रीडाने फोटोग्राफर कॉरी ट्रॅनसोबत २०१९मध्ये साखरपुडा केला. कॅरीच्या वाढदिवशी फ्रीडाने फोटो शेअर करत साखरपुडा केल्याची माहिती दिली होती. त्या दोघांनीही अद्याप लग्न केलेले नाही. फ्रीडा ही एक भारतीय अभिनेत्री आहे. पण ती ब्रिटीश आणि अमेरिकन चित्रपटांमध्ये काम करताना जास्त दिसते.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Freida Pinto (@freidapinto)