पुरस्कार घ्यायला स्टेजवर आलेल्या अभिनेत्रीने अचानक कपडे उतरवले…., हा प्रकार पाहून उपस्थित चक्रावले!

कोरिनला स्टेजवर पुरस्कार देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र स्टेजवर पोहोचताच तिने सर्वांसमोर ड्रेस उतरवला आणि नग्नावस्थेत तेथे उभी राहिली.

    फ्रेंच ऑस्कर सोहळ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या सोहळ्यामध्ये एका अभिनेत्रीने चक्क स्टेजवर सर्वांसमोर कपडे उतरवले. या अभिनेत्रीचे नाव कोरिन मासेरियो असं आहे. ती ५७ वर्षांची आहे. कोरिन जेव्हा स्टेजवर गेली तेव्हा तिने गाढवासारखा पोषाख परिधान केला होता. या अगळ्यावेगळ्या ड्रेसवर रक्ताचे डाग होते. मात्र तिच्या अचानक अश्या वागण्यामुळे सगळेच चक्रावले.

    कोरिनला स्टेजवर पुरस्कार देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र स्टेजवर पोहोचताच तिने सर्वांसमोर ड्रेस उतरवला आणि नग्नावस्थेत तेथे उभी राहिली. कोरिनने तिच्या पाठिवर फ्रांसच्या पंतप्रधानांसाठी एक संदेश लिहिला होता. त्यामध्ये ‘नो कल्चर, नो फ्यूचर’ म्हणजेच संस्कृती नाही तर भविष्य नाही असं लिहीलं होतं.

    गेल्या तीन महिन्यापासून कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे फ्रान्समधील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे कलाकारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्वाला विरोध दर्शवण्यासाठी कोरिनने वापरलेली अनोखी पद्धत सध्या चर्चेत आहे