शर्मिला टागोर ते गीता बसरा पर्यंत ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींनी थाटला क्रिकेटरशी संसार!

बॉलिवूडमधील बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी क्रिकेटर्सशी लग्न केलं आहेत. चला जाणून घेऊया त्या अभिनेत्री कोण आहेत.

  बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा हिने २९ ऑक्टोबर २०१५ रोजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगशी लग्न केले, त्यानंतर या जोडप्यास १० जुलैला मुलगा झाला. मुलाच्या अगोदर या जोडप्याला एक मुलगी देखील आहे. गीता बसराशिवाय बॉलिवूडमधील बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी क्रिकेटर्सशी लग्न केलं आहेत. चला जाणून घेऊया त्या अभिनेत्री कोण आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

  अनुष्का शर्मा- विराट कोहली

  बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने २०१८  मध्ये इटलीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशी लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षानंतर, फेब्रुवारी २०२१ मध्ये, या दोघांना एक मुलगी झाली, ज्याचे नाव वामिका. आता अभिनेत्री लवकरच अभिनयात पुनरागमन करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

   

  सागरीका- जहीर खान

  चक दे ​​इंडिया चित्रपटाने प्रसिद्धी मिळवलेल्या सागरीकाने २०१७ मध्ये क्रिकेटपटू झहीर खानशी लग्न केलं. आता लग्नाला तीन वर्ष झाली आहे, लवकरच एक छोटासा पाहुणा सागरिकाच्या घरात लवकरच दाखल होणार आहे.

  हार्दिक पांड्या- नताशा स्टॅनकोविच

  हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांनी १ जानेवारी २०२०मध्ये साखरपूडा केला. आणि त्यानंतर ३१ मे २०२० दोघांनीही ते पालक बनणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. नताशा- हार्दिकने त्यांच्या सीक्रेट वेडिंगचे फोटो शेअर करत सगळ्यांना आश्चर्य चकित केलं. ३० जुलैला तिने एका मुलाला जन्म दिला. दोघांनी आपल्या मुलाचे नाव अगस्त्य पंड्या ठेवले आहे.

  शर्मिला टागोर- मंसूर अली खान

  एकेकाळी बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री असणारी शर्मिला टागोर हिने सन १९६८ मध्ये क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतोडीशी लग्न केलं. या लग्नापासून त्याला तीन मुले सैफ अली खान, सोहा अली खान आणि सबा अली खान आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial)

  हेजल कीच- युवराज सिंह

  बॉडीगार्ड या चित्रपटात सलमान खान आणि करीना कपूरसोबत दिसलेल्या हेजल कीचने काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर क्रिकेटर युवराज सिंगसोबत लग्न केले. लग्नादरम्यान हजलला गुरबासंत कौर असे नाव देण्यात आले. हे जोडपे अनेकदा आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.