‘हवं ते हॉस्पिटल सोडा पण साधा बेड मिळत नव्हता, फुलवा खामकरनं सांगितला कोरोनाचा अनुभव!

हा अनुभव शेअर करताना फुलवा यांनी त्यांच्या सास-यांना केईएममध्ये अॅडमिट केले होते. सरकारी दवाखान्यामध्ये आपल्या मनात पूर्वग्रह असतो परंतु तो कसा चुकीचा आहे याचा अनुभवी फुलवा यांनी या पोस्टमध्ये मांडला आहे

  गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत चालली आहे. त्यामुळे करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्याचा प्रचंड ताण आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. असाच एक अनुभव नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  फुलवा खामकर यांच्या काकांना करोनाची लागण झाली. त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर झाल्याने व्हेंटिलेटर लावण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. सध्याच्या परिस्थितीमध्ये बेड मिळवणे हे मोठे आव्हान होते. हा सगळा अनुभव फुलवा कसा होता हे सगळे त्यांनी या पोस्टमध्ये मांडले आहे. या पोस्टमधून सरकारी हॉस्पिटल आणि तिथे काम करणा-या डॉक्टरांसह सर्व कर्मचारी झोकून देऊन काम करत आहेत, त्याबद्दल त्यांचे जाहीरपणे आभार मानले आहेत आणि त्यांच्या कामाचे मनापासून कौतुक केले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by PHULAWA (@phulawa)

  हा अनुभव शेअर करताना फुलवा यांनी त्यांच्या सास-यांना केईएममध्ये अॅडमिट केले होते. सरकारी दवाखान्यामध्ये आपल्या मनात पूर्वग्रह असतो परंतु तो कसा चुकीचा आहे याचा अनुभवी फुलवा यांनी या पोस्टमध्ये मांडला आहे. या पोस्टच्या शेवटी फुलवा यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करणा-या प्रत्येक कर्मचा-याचे, प्रशासनाचे आणि सरकारचे मनापासून आभार मानले आहेत.

  बिल केवळ १० रूपये

  खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर आणि इतर आजार असलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी अव्वाच्या सव्वा पैसा उकळला जातो. मात्र फुलवाने सरकारी रूग्णालयाती अनुभव सांगितला आहे. एखाद्या खासगी रूग्णालयात ज्या प्रमाणे महागडे इंजेक्शन दिली जातात, त्याचप्रमाणे फुलवाच्या सास-यांवरही अशीच ट्रीटमेंट करण्यात आली. मात्र संपूर्ण ट्रिटमेंटचे बिल होते अवघे १० रुपये फक्त!