‘डिलिव्हरी रूममध्ये असताना हरभजन सतत फोटो काढत होता, गीता बासराने सांगितला तो अनुभव!

गीताने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत डिलिव्हरीच्या वेळी हरभजन सिंग काय करत होता हे गीताने सांगितले. ‘हरभजन तिच्या सोबत डिलिव्हरी रूममध्ये होता आणि तो सतत फोटो काढत होता.

    अभिनेत्री गीता बसार आणि पती हरभजन सिंग यांनी १० जुलैला दुसऱ्या बाळाला जन्म दिला. मात्र, गीता आणि हरभजन यांनी अजुनही त्यांच्या मुलाचे नाव काय आहे हे त्यांच्या चाहत्यांना सांगितले नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गीताने मुलाच्या जन्मावर तिच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती ते सांगितले आहे.

    गीताने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत डिलिव्हरीच्या वेळी हरभजन सिंग काय करत होता हे गीताने सांगितले. ‘हरभजन तिच्या सोबत डिलिव्हरी रूममध्ये होता आणि तो सतत फोटो काढत होता. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला आनंद झाला आणि तो नाचू लागला’, असे गीताने सांगितले.

     “जेव्हा डिलीव्हरी होणार असे सांगण्यात आले, तेव्हा त्याने फोटो काढायला सुरुवात केली. त्याला मुलं खूप आवडतात. सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरच्या मुलांसोबत तो अजुनही खेळतो. बाळाला पाहिल्यानंतर तर त्याचा आनंद हा शिगेला पोहोचला. मी आणि हरभजन आम्ही दोघं आमच्या मुलाला वेगवेगळ्या नावाने हाक मारतो. कधी छोटू तर कधी शेरा.”