गीता माँचं या कोरिओग्राफरशी होतं अफेअर, आज वयाच्या ४८ व्या वर्षीही आहे अविवाहित?

गीता आणि राजीवचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. ते नेहमी एकत्र फिरताना दिसत होते. पण राजीव हा जवळचा मित्र असल्याचे गीताने सांगितले होते.

    लोकप्रिय कोरिओग्राफर म्हणून गीता कपूर ओळखली जाते. सध्या ती छोट्या पडद्यावरील ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’मध्ये परीक्षक आहे. या शिवाय इंडिया डान्स, सुपर डान्स, इंडिया के मस्त कलंदर आणि इंडियाज बेस्ट डान्सर या रिअॅलिटी शोमध्ये गीताने परीक्षक म्हणून काम केलय. गीताने वयाच्या १५ व्या वर्षापासूनच डान्सच्या करिअरला सुरुवात केली होती. तिने ‘तुझे याद ना मेरी आइ’, ‘गोरी गोरी’ अशा अनेक गाण्यांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. तिने फराह खान यांच्या डान्स ग्रूपमध्ये काम केले आहे. आज ५ जूलैला गीताचा वाढदिवस आहे.

    ४८ वर्षांच्या गीताने अद्याप लग्न केलेले नाही. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर सिंदूर लावलेले फोटो शेअर केले होते. त्यानंतर गीताचे लग्न झाले अशा चर्चा रंगल्या होत्या. पण एका शूटसाठी तिने असा लूक केल्याने तिने म्हटले होते. त्यापूर्वी गीताचे नाव कोरिओग्राफर राजीव खिंचीसोबत जोडले गेले होते. राजीव हा एक दिग्दर्शक, अभिनेता आणि कोरिओग्राफर आहे. गीता आणि राजीवचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. ते नेहमी एकत्र फिरताना दिसत होते. पण राजीव हा जवळचा मित्र असल्याचे गीताने सांगितले होते.

    गीताने फराह खानला असिस्ट केले होते. त्यानंतर तिने कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, कभी खुशी कभी गम, मोहब्बतें, कल हो ना हो, मैं हूं ना आणि ओम शांति ओम अशा अनेक चित्रपटांसाठी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम केले. त्यानंतर तिने फिजा, अशोका, साथिया, हे बेबी, अलादीन, तीस मार खान या चित्रपटातील गाणे कोरिओग्राफ गेले. त्यानंतर गीताला लोकप्रियता मिळाली.