gahana 1

अश्लील चित्रपटात अभिनय केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली गेहना वाशिष्टने पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक होण्याच्या भितीपोटी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायासयात अर्ज दाखल केला होता.

    पोर्नोग्राफी प्रकरणात अटक होण्याच्या भितीपोटी न्यायालयाची पायरी चढलेल्या गेहना वसिष्ठच्या अटकपूर्व जामीन अर्जावर कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. याचिकेवरील राखून ठेवलेला निकाल मंगळवारी जाहीर करताना न्यायालयाने गेहनाचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

    अश्लील चित्रपटात अभिनय केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली गेहना वाशिष्टने पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक होण्याच्या भितीपोटी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायासयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे तिने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका केली होती. गेहनाची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडे आवश्यक ती सर्व माहिती आहे. याआधी तिला अटकही करण्यात आली होती. ज्यात चार महिन्यांहून अधिकाकाळ ती कारागृहात होती. तेव्हाच तिच्याविरोधात दुसरी आणि त्यानंतर तिसरी एफआयआर नोंदविण्यात आली. तिसऱ्या एफआयआरमध्ये गंभीर स्वरुपाचे आरोप केले असून आरोपींनी पीडितांना चुंबन आणि लैंगिक दृश्ये करण्यास भाग पाडले असे आरोप केले. मात्र, तक्रारदार महिलेने त्या चित्रपटाचे प्रमोशनही केले होते. त्यामुळे इथे पोलिसांकडून दबाब टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून आम्ही मोठ्या लोकांची नावं जाहीर करू मग ते आम्हाला जामीन मिळू देतील. गेहनाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बॅंक खात्यांची माहितीही पोलिसांकडे असल्याचे गेहनाकडून सांगण्यात आले होते. त्याची दखल घेत न्या. संदीप शिंदे यांनी आपला निकाल राखून ठेवला होता तो मंगळवारी जाहीर केला आणि गहेनाला कोणताही दिलासा देण्यास नकार देत तिची अटकपूर्व जामीनाची मागणीही फेटाळून लावली.

    सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार 

    उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला असला तरीही आम्ही या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे गेहनाच्या वकिलांनी सांगितले आहे. तसेच गेहनाला या प्रकरणात गोवण्यात आले असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.