जेनेलिया वहिनींच्या हाताला झाली दुखापत, व्हिडिओ बघून वाटेल काळजी, पण पोस्ट वाचून वाटेल तिचा अभिमान!

या व्हिडिओला जेनेलियाने छानसं कॅप्शनही दिलं आहे. काही दिवसांपूर्वी मी स्केटिंग शिकण्याचं ठरवलं. जेणेकरून मी जास्त प्रेरणायादी होईन आणि माझ्या मुलांना चांगली कंपनी मिळेल.

  बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणजे रितेश आणि जेनेलिया देशमुख. हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. ते आपल्या चाहत्यांसाठी आपले फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असतात. त्यांच्या व्हिडिओला चाहत्यांची पसंतीही मिळते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

  जेनेलियाने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या पावरी स्टाइलने हा व्हिडीओ पोस्ट केला असला तरी यात जेनेलियाच्या हाताला दुखापत झाल्याचं दिसतंय. जेनेलिया स्केटिंग करत असताना पडल्याचं या व्हिडीओत दिसतंय. त्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केलीय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

  या व्हिडिओला जेनेलियाने छानसं कॅप्शनही दिलं आहे. काही दिवसांपूर्वी मी स्केटिंग शिकण्याचं ठरवलं. जेणेकरून मी जास्त प्रेरणायादी होईन आणि माझ्या मुलांना चांगली कंपनी मिळेल. मला वाटलं मी स्केटिंग शिकल्यानंतर एक कूल व्हिडीओ इन्स्टग्रामवर शेअर करेन. पण नंतर मला वाटलं कि हा व्हिडीओच पोस्ट करावा. सर्वच सक्सेस स्टोरी पोस्ट करतात मात्र जेव्हा आपण पडतो तेव्हाचं काय? काहीवेळा झेप घेण्यासाठी आधी तुम्हाला पडावं लागतं. पडल्यानंतरही पुन्हा उभं राहवं हे मला कळलंय. मी प्रयत्न केला. आणि मी यश मिळेपर्यंत सतत प्रयत्न करत राहिन” असं कॅप्शन देत जेनेलियाने तिच्या चाहत्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)