genelia

बॉलिवूडमधलं सगळ्यात क्यूट कपल म्हणजे जेनेलिया आणि रितेश देशमुख. बऱ्याच वर्षांच्या मैत्रीनंतर या दोघांनी लग्न केलं आणि आज त्यांचा संसार सुरळीत सुरू आहे. अर्थात या जोडीकडे पाहिले की जेनेलिया आणि रितेश एकमेकांसाठीच बनले आहेत. या दोघांची प्रेमकहाणीही खूप इंट्रेस्टींग आहे. एका चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा रितेश आणि जेनेलियाची ओळख झाली. पुढे मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.

  बॉलिवूडमधलं सगळ्यात क्यूट कपल म्हणजे जिनिलिया आणि रितेश देशमुख. आज जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांची खास लव्ह स्टोरी.बऱ्याच वर्षांच्या मैत्रीनंतर या दोघांनी लग्न केलं आणि आज त्यांचा संसार सुरळीत सुरू आहे. अर्थात या जोडीकडे पाहिले की जेनेलिया आणि रितेश एकमेकांसाठीच बनले आहेत. या दोघांची प्रेमकहाणीही खूप इंट्रेस्टींग आहे. एका चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा रितेश आणि जेनेलियाची ओळख झाली. पुढे मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

   

  ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले. त्यावेळी जेनेलिया सुरुवातीला रितेशसोबत बोलतही नव्हती. रितेशचे वडील मुख्यमंत्री होते, म्हणून ती बोलण्यास कचरत असल्याचं रितेश म्हणाला. इतकंच नव्हे तर जेव्हा ते दोघे बोलायला लागले तेव्हा जेनेलियाने त्याला पहिला प्रश्न हाच विचारला की तुझ्यासोबत सुरक्षारक्षक का नाहीत? हळूहळू त्या दोघांमध्ये मैत्री होऊ लागली आणि त्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झालं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

  रितेश म्हणाला- आम्ही अनोळखी लोकांप्रमाणे एकमेकांशी काम करण्यास सुरवात केली. मग एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला. आम्ही सेटबाहेर मित्र बनलो. हैदराबादचे शूट संपल्यानंतर मी जेनेलियाला खूप मिस केलं. बर्‍याच वेळा मला तीला फोन करावासा वाटला पण तसे करणे ठीक आहे की नाही हे मला ठाऊक नाही. जेनेलियावरील प्रेमाची भावना रात्रीतून जाणवली नाही. आम्ही हळू हळू एकमेकांबद्दलच्या आपल्या भावना समजू लागलो. दिवस, महिने आणि वर्षे गेली आणि त्यानंतर आम्ही २०१२ मध्ये लग्न केलं. आणि आमचे नातं शेवटपर्यंत पोहचलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

   

  पण एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत रितेशने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले. त्याचे हे पहिले प्रेम म्हणजे फोटोग्राफी. त्याला फोटोग्राफीचा अफाट छंद होता. मात्र चित्रपटात पदार्पण केल्यानंतर त्याला आपल्या प्रेमाचा विसर पडला होता. जेनेलियानेच त्याला पुन्हा फोटोग्राफी करण्याचा सल्ला दिला. फक्त सल्ला देऊन न थांबता तिने त्याला कॅमेरा भेट देऊन आपल्या पतीचे हरवलेले प्रेम पुन्हा मिळवून दिले.

  रितेश आणि जेनेलिया २०१२ मध्ये लग्नबंधनात अडकले असून त्यांना आता दोन मुलं आहेत. बॉलिवूडच्या सर्वांत आवडत्या कपल्समध्ये आजही या दोघांचं नाव पाहायला मिळतं.