देवा, तूझ्या आगमनापर्यंत संपू दे ही कोरोनाची वार्ता

कोरोनाचा आकडा रोजच वाढतो आहे

काळजीने मनुष्याचा जीव काढतो आहे

लस मिळेपर्यंत कोरोना आटोक्यात नाही येणार

असा वाढतच राहिला तर, अनेकांचे जीव ही घेणार

याची काळजी करण्यापेक्षा ,काळजी घेणे हाच उपाय

उगीच बाहेर जाण्यापेक्षा, घरातच राहू द्या ना पाय

एकामुळे दुसऱ्यांचा यात जातो हकनाक बळी

लॉकडाऊनचे नियम जरा उतरू द्या गळी

काही दिवसांत येणार आहे सर्वांचा सुखकर्ता दुःखहर्ता

देवा, तुझ्या आगमनापर्यंत संपू दे ही कोरोनाची वार्ता

– नासा येवतीकर, धर्माब