कौन बनेगा करोडपतीच्या शोमध्ये हॉट चेअरवरती दिसणार गोल्डनबॉय नीरज चोप्रा व हॉकी खेळाडू पी. आर. श्रीजेश

ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता खेळाडू नीरज चोप्रा आणि हॉकी खेळाडू पी. आर. श्रीजेश सहभागी झालेले दिसून येत आहेत. नुकताच सोनीने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर केबीसीचा नवा प्रोमो शेयर केला आहे. तसेच त्याला कॅप्शन देत म्हटलं आहे आपल्या देशाचं नाव मोठं करून केबीसीमध्ये येत आहेत.

    मुंबई: ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवागसुद्धा सहभागी झाले होते. त्यानंतर आता यावेळीसुद्धा क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेला खेळाडू खास पाहुणे केबीसीमध्ये हजेरी लावणार आहेत. या नव्या पाहुण्यांसोबत केबीसी शोचा नवा प्रोमो समोर आला आहे.

    यामध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता खेळाडू नीरज चोप्रा आणि हॉकी खेळाडू पी. आर. श्रीजेश सहभागी झालेले दिसून येत आहेत. नुकताच सोनीने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर केबीसीचा नवा प्रोमो शेयर केला आहे. तसेच त्याला कॅप्शन देत म्हटलं आहे आपल्या देशाचं नाव मोठं करून केबीसीमध्ये येत आहेत.

    गोल्ड मेडल मिळवल्यानंतर नीरज चोप्रा अनेक मुलाखतींमध्ये दिसून आला आहे. मात्र, ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये त्याचे ऍपियरन्स खूपच खास असणार आहे. यावेळी अमिताभ बच्चन नीरज आणि श्रीजेशला विचारत आहेत मी तुमच्या मेडल्सना हात लावू शकतो का?

    तसेच नीरज चोप्रा अमिताभ यांना हरियाणवी बोलायला शिकवतो. तसेच श्रीजेशने अमिताभ यांना सांगितले की, २०२१ ने त्याची आणि संपूर्ण संघाची लाईफ बदलून टाकली आहे.