kareena and saif

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्याकडे लवकरच एक चिमुकला पाहुणा येणार आहे. करीना दुसऱ्यांदा आई होणार आहे. सैफ अली खान आणि करीनाने यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की आमच्या घरात अजुन एक पाहुणा येणार आहे. सगळ्या शुभचिंतकांच्या प्रेमासाठी आभारी आहोत.

सैफ आणि करीनाच्या पोस्टमुळे चाहत्यांना खरोखर एक गुड न्यूज मिळाली आहे. सैफ आणि करीनाने २०१२ मध्ये लग्न केले.त्यानंतर २०१६ मध्ये त्यांचा मुलगा तैमुर याचा जन्म झाला.