sivaji ganeshan

गुगलने शिवाजी गणेशन यांना मानवंदना(Google Pays Tribute To Sivaji Ganesan) देण्यासाठी बनवलेलं डुडल बघितल्यानंतर शिवाजी गणेशन नक्की कोण आहेत ? (Who Is Sivaji Ganesan?)  असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

  गुगलने(Google Doodle For Sivaji Gaesan Birth Anniversary) आज शिवाजी गणेशन यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त खास डुडल तयार करून मानवंदना(Tribute To Sivaji Ganesan) दिली आहे.बंगळूरमधील कलाकार नुपूर राजेश चोकसी यांनी हे डुडल तयार केलं आहे. हे डुडल बघितल्यानंतर शिवाजी गणेशन नक्की कोण आहेत ? (Who Is Sivaji Ganesan?)  असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

  शिवाजी गणेशन हे तामिळ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते होते. दिवंगत अभिनेते शिवाजी गणेशन यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील मार्लन ब्रँडो म्हटले जायचे. लॉस एंजलिस टाइम्सने गणेशन यांना मार्लन ब्रँडो ही उपाधी दिली होती. तामिळ चित्रपटसृष्टीतील ते सगळ्यात उंच अभिनेते होते.

  तामिळनाडूमध्ये १९२८ साली शिवाजी यांचा जन्म झाला होता. गणशेमूर्ती हे त्यांच मूळ नाव आहे. अभिनयात करिअर करण्यासाठी त्यांनी वयाच्या सातव्या वर्षीच घर सोडलं.  ते पुढे एका थिएटर ग्रुपमध्ये सामील झाले. सुरुवातीला बालकलाकार आणि महिला कलाकाराच्या भूमिका त्यांनी साकारल्या. १९४५ मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत “शिवाजी कांडा हिंदू राज्यम” या नाटकात शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजल्यामुळे त्यांना शिवाजी नावाने ओळखू लागले. ते शिवाजी गणेशन नावानेच सर्वत्र ओळखू जाऊ लागले.

  ‘पराशक्ति’ या १९५२ मध्ये आलेल्या सिनेमातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. शिवाजी गणेशन यांनी जवळपास ३०० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा २८८ भाषांतील विविध सिनेमांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

  मोठे संवाद आणि भारतीय पौराणिक ग्रंथांची जाण असलेले अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती. तसेच गणेशन यांनी भरतनाट्यम, कथ्थक आणि मणिपुरी नृत्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. करिअरच्या सुरुवातीच्या काळात गणेशन यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकाही खूप गाजल्या.

  शिवाजी गणेशन यांचा १९६१ सालामध्ये आलेला ‘पसमालर’ हा सिनेमा त्यांच्या कारकिर्दीतील सुपरहिट ठरलेला सिनेमा होता. त्यानंतर १९६४ सालामध्ये आलेला ‘नवरथी’ हा त्यांचा १००वा सिनेमा असून यात त्यांनी नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. १९६० सालामध्ये गणशेन यांना त्यांच्या “वीरपांडिया कट्टाबोम्मन” या सिनेमासाठी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय अभिनेते ठरले.