Maharashtra Governor wrote to CM Uddhav Thackeray

राज्य सरकार (state government) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cmUddhav Thackeray) यांच्यावर जहरी टीका करणाऱ्या कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) कार्यालयावर कारवाई करत मुंबई महानगरपालिकेने (BMC) कंगनाला दणका दिला होता.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण(SSR Death Case) आणि ड्रग्स रॅकेटवरून (drug racket) गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी शिवसेना (shivsena) आणि अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) यांच्याl वाद सुरू आहे. दरम्यान, राज्य सरकार (state government) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यावर जहरी टीका करणाऱ्या कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई करत मुंबई महानगरपालिकेने (BMC) कंगनाला दणका दिला होता. दरम्यान, कंगना रणौत आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादामध्ये आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor BhagatSingh Koshyari) यांनी उडी घेतली आहे.

कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे या कारवाईबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली असून, त्याबाबतची माहिती राज्य सरकारला देण्याची सूचना राज्यपालांनी केल्याचे वृत्त आहे. तसेच राज्यपाल याबाबत राज्य सरकारविरोधात केंद्र सरकारकडे अहवाल पाठवणार, असल्याची माहिती टीव्ही ९ ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

दरम्यान, कंगना रणौत वादामध्ये आपली काही भूमिका नसल्याचे भाजपाने म्हटले होते. मात्र आता या प्रकरणावरून राज्यपालांनी केंद्राकडे अहवाल पाठवण्याची तयारी केल्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद चिघळणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत कंगनासोबतच शिवसेना आणि भाजपामध्येही सामना रंगण्याची शक्यता आहे.

कंगना रणौतच्या कार्यालयातील नियमबाह्य बांधकामावर पालिकेचा हातोडा

अभिनेत्री कंगना रणौतच्या वांद्रे, पाली हिल येथील कार्यालयातील नियमबाह्य बांधकामाप्रकरणी दिलेल्या नोटीसची मुदत बुधवारी सकाळी संपली. बांधकामासाठी पालिकेकडून घेतलेल्या परवानगीची कागदपत्रे तिने २४ तासांच्या मुदतीत सादर न केल्याने अतिक्रमण निर्मूलन विभागाने सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलीस फौजफाट्यासह कारवाईला सुरुवात केली. सुमारे दोन तास चाललेली ही कारवाई, मुंबई उच्च न्यायलयातून स्थगितीचे आदेश आल्यानंतर थांबविण्यात आली.

उद्धव ठाकरे हे बॉलीवूड माफियांचे लाडके; कंगनाची मुख्यमंत्र्यांवर टीका

महापालिका कर्मचाऱ्यांनी कार्यालयावर तोडक कारवाई केल्याने संतप्त झालेल्या अभिनेत्री कंगना रणौतने बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत आज माझे घर तुटले, उद्या तुमचा अहंकार तुटेल, काळाचा महिमा आहे, तो बदलत असतो, असे सांगतानाच बॉलीवूड माफिया आणि उद्धव ठाकरे यांचे गुळपीठ या निमित्ताने उघड झाल्याचा आरोप कंगनाने केला.

मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनाने आपल्या कार्यालयाची अवस्था व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करत ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा व्हिडिओ पोस्ट केला. यात मुखमंत्री ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत, उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटते, फिल्म माफियांसोबत मिळून तुम्ही माझे घर पाडून मोठा बदला घेतला आहे. आज माझे घर तुटले आहे, उद्या तुझा अहंकार तुटेल. हे काळाचे चक्र आहे, लक्षात ठेवा हे नेहमीच सारखे नसते.

ही तर महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत दहशत : देवेंद्र फडणवीस

अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घराचे बांधकाम ज्या पद्धतीने पाडण्यात आले त्यावरून राज्यात सरकार पुरस्कृत दहशत सुरू असल्याचे दिसते, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात इतके घाबरट आणि लोकशाहीविरोधी सरकार यापूर्वी कधीही बघितलेले नाही. आपल्या विचारांचा विरोध करणाऱ्या व्यक्ती, पत्रकार या सर्वांना दाबण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. ज्या प्रकारे एखाद्या वक्तव्याने मुंबई, महाराष्ट्राचा अवमान होतो त्याचे समर्थन करता येत नाही; पण सरकारच्या अशा दहशतीचेही समर्थन करता येणार नाही. या कृतीमुळे देशात महाराष्ट्राची बदनामी झाली आहे.