गोविंदा आणि करिश्माची जोडी स्टार भारतच्या नव्या शो मध्ये दिसणार एकत्र

स्टार भारत आता प्रेक्षकांसाठी नवा शो घेऊन येणार आहे.  या कार्यक्रमाची संकल्पना आणि स्टारकास्ट अद्याप उघड झाले नसले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,९० च्या दशकातील प्रसिद्ध बॉलीवूड जोडी – गोविंदा आणि करिश्मा कपूर या नव्या शोमध्ये जज म्हणून एकत्र काम करताना दिसणार आहेत. बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध जोडी आपल्या विनोदी स्पर्शाने आणि हसण्याच्या बरोबरीने बॉलीवूडच्या त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या तयारीत आहे.

शोचे निर्माते गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्याशी चर्चा करत आहेत. त्या दोघांना लवकर नव्या शोमध्ये आणण्यासाठी निर्माते प्रयत्नशील आहेत. ही जोडी टेलिव्हिजनवर आणण्यामागचे कारण म्हणजे  गोविंदा आणि करिश्मा हे ९० च्या दशकात विनोदी भूमिकांसाठी परिचित आहेत आणि ते नव्या शोच्या संकल्पनेसाठी एकदम परफेक्ट आहेत. आता या नव्या शोची घोषणा स्टार भारत कधी करणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.